कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला दहा किलोस ७० ते २३० रुपये दर

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२० रोजी कांद्यास दहा किलोस ७० ते २३० रुपये दर मिळाला होता. लसणास दहा किलोस ८०० ते १७०० रुपये दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये टोमॅटोची १५२० कॅरेटची आवक होती. टोमॅटोस दहा किलोस २० ते ६० रुपये दर होता. बटाट्यास दहा किलोस १२० ते २१० रुपये दर होता.

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट

ओल्या मिरचीस दहा किलोस २०० ते २७० रुपये दर होता. भेंडीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर होता. वरण्याची ६९ पोती आवक झाली. घेवड्यास दहा किलोस २०० ते ३००, ओला वाटाण्यास दहा किलोस २५० ते ३८०, गवारीस दहा किलोस २८० ते ६२० रुपये दर होता. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ७०० रुपये दर होता. पालक, पोकळा, शेपूस शेकडा २०० ते ७०० रुपये दर होता.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान ज्वारीच्या आवकेत वाढ

दोडक्यास दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगेस दहा किलोस ३०० ते ४६० रुपये दर मिळाला. फळांमध्ये द्राक्षास किलोस१५ ते ३५ रुपये दर होता. . डाळिंबास किलोस २० ते ४० रुपये दर मिळाला. अननस डझनास १२० ते १५० रुपये दर होता.