सकाळी गरम पाण्यात हळद मिसळून पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिणे चांगले असते असे आपण ऐकतो. पण प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या जात नाही. मात्र सुरुवातीला ही सवय लावून घेणे अवघड वाटले तरीही उठल्यावर चहाऐवजी कोमट पाणी हळद घालून प्यायल्यास त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे…..

  • हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते.
  • कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच ब्लॉक हटवतात. हृदयासंबाधित आजारांवर गुणकारी.
  • हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेंट्री गुण असतात ज्याचा शरीराला फायदा होतो. यासोबतच सांधेदुखीमध्येही हळदीचा फायदा होतो. ज्यांना आर्थराइटिसची समस्या आहे अशा व्यक्तींनी या पाण्याने आपल्या दिवसाची सुरूवात करावी.
  • सतत तोंड येत असल्यास हे पाणी प्यावे.
  • हे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित होते. मेटाबॉलिज्म नियंत्रित करुन शरीरातील जमा झालेले फॅट्स कमी करण्याचे काम करते.

महत्वाच्या बातम्या –