हापूस आंबा यंदा एकाच वेळी बाजारपेठेत

साधारणतः जानेवारीमध्यापासून सुरू होणारा हापूस आंबा काढणी हंगाम यंदा एप्रिलमध्ये होणार आहे. उशिराच्या आगमनामुळे हापूस आंब्याचे बाजारपेठीय आणि निर्यातीचे गणित बदलणार असून, ऐन एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये आवक होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामुळे निर्यात वाढीचीही शक्यता असल्याने काही अंशी बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.  यंदा मॉन्सूनचा दीर्घ मुक्काम, ऐन मोहोर लागण्याच्या अवस्थेत झालेला अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी आदी विविध कारणांनी आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

केवायसीच्या नावाखाली पेटीएमवापरकर्त्यांची फसवणुक

बहर व्यवस्थापन लांबले परिणामी दरवर्षी जानेवारीच्या मध्यावधीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये सुरू होणारा हापूस आंब्याचा हंगाम दोन महिने उशिराने सुरू होणार आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेबरोबर निर्यातीवर देखील परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदारांना आहे. तर यंदा निर्यातीचा कालावधीदेखील तीन महिन्यांवरून एक ते दीड महिनाच होणार असला तरी निर्यात वाढण्याचे संकेत आहेत.  यदाच्या आंबा हंगामाबाबत बोलताना कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्थेचे अध्यक्ष विवेक भिडे म्हणाले, ‘‘यंदाच्या हवामानाच्या सातत्याच्या बदलांमुळे आंबा हंगाम संकटात आला आहे.

मोहराला अनुकूल वातावरण नसल्याने हापूसचा हंगाम दीड महिने लांबला

मॉन्सूनचा दीर्घ मुक्काम, मोहोर लागण्याच्या अवस्थेत ऑक्टोबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि लांबलेली थंडी यामुळे अद्याप फळधारणा झालेली नाही. ऑक्टोबरमध्ये लागलेला मोहोर अवकाळी पावसाने गळल्याने, आता पुन्हा झाडांना पालवी फुटलेली आहे. यामुळे नवीन मोहोर लागण्याची वाट आम्ही पाहत आहोत. तर सातत्याने ढगाळ वातावरणामुळे देखील थंडी गायब आहे. याचा परिणामदेखील मोहोरावर झाला आहे. परिणामी, यंदाचा हंगाम दोन महिने लांबणीवर पडला आहे.’’