मोठी बातमी – तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कृषी कायदा अखेर मागे घेण्यात आला असून तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही विधेयकं रद्द करण्यात आली. यावेळी लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर(Narendra Singh Tomar) यांनी कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक पटलावर सादर करताच विरोधकांनी मोठा गोंधळ केला. या गोंधळातच हे विधेयक पारित झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाची सुरूवात गदारोळाने झाल्याने सभागृहाचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज १२ पर्यंत स्थगित केले आहे. विरोधकांनी गदारोळ सूरू करताच सभापतींनी सर्व खासदारांना संसदेच्या प्रतिष्ठेचा मान ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र तरी देखील विरोधक शांत होत नसल्याचे पाहता त्यांनी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधताना अधिवेशनादरम्यान सर्व खासदारांना गदारोळ न करण्याचे आवाहन केले होते. तसेच संसदेच्या या अधिवेशनात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या –