Share

राज्यात २५ नोव्हेंबरपर्यंत १६२.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन

Published On: 

राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात  २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १५३ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ७८ खासगी व या मध्ये राज्यातील ७५ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात  २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत तब्बल  १८०.९९ लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे.

राज्यात २५ नोव्हेंबर पर्यंत तब्बल १६२.३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती मिळाली आहे,  तर राज्याचा सरासरी साखर उतारा ८.९७ टक्के इतका आहे.

राज्यात यावर्षी २५ नोव्हेंबरपर्यंत सर्वाधिक ३७ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, राज्यात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ४२.९६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ३४.९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  साखर उतारा ८.१४ टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)साखर (Sugar)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या