Dry Cough | कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Dry Cough | टीम कृषीनामा: अनेक वेळा बहुतांश लोक कोरड्या खोकल्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. कारण कोरडा खोकला सहजपणे दूर होत नाही. त्यामुळे कोरडा खोकला दूर करण्यासाठी लोक घरगुती उपाय शोधत असतात. कारण जेव्हा कोरड्या खोकल्याचा त्रास होतो तेव्हा शरीर दुखणे, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा दुखणे इत्यादी समस्या देखील निर्माण होतात. या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही पण जर घरगुती उपाय शोधत असाल, तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोरड्या खोकल्यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. कोरडा खोकला बरा करण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात.

पाण्याचे माफक प्रमाणात सेवन करणे (Drink plenty of water-For Dry Cough)

जेव्हा तुम्हाला कोरडा खोकला येतो, तेव्हा तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवले पाहिजे. कारण कोरडा खोकल्या आल्यावर घशात ताण निर्माण होतो आणि घशाचे स्नायू ताणले जातात. परिणामी घसा दुखण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे कोरडा खोकला झाल्यास तुम्ही माफक प्रमाणात पाण्याचे सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचे देखील सेवन करू शकतात. कोमट पाण्याचे सेवन केल्याने व्हायरल इन्फेक्शन देखील दूर होऊ शकते.

वाफ (Steam-For Dry Cough)

कोरड्या खोकल्यामुळे छातीत वेदना व्हायला लागतात. या वेदना दूर करण्यासाठी तुम्ही वाफ घेऊ शकतात. वाफ घेतल्याने श्वसनक्रिया व्यवस्थित होते. वाफ घेतल्याने फुप्फुसातील रक्तसंचय दूर होतो आणि कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो.

मध (Honey-For Dry Cough)

कोरड्या खोकल्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्ही थेट मध खाऊ शकतात किंवा मधामध्ये आल्याचा रस मिसळून त्याचे सेवन करू शकतात. याचे सेवन केल्याने कोरडे खोकल्याची समस्या सहज दूर होऊ शकते.

कोरड्या खोकल्याच्या समस्येला दूर करण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर वर्कआउट नंतरचा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही आहारात पुढील हेल्दी स्नॅक्सचा समावेश करू शकतात.

अंडी (Egg-For Post Workout Snacks)

तुम्ही व्यायामानंतर अंड्याचे सेवन करू शकतात. कारण अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका अंड्यामध्ये सुमारे सहा ते आठ ग्रॅम प्रोटीन आढळून येतात. त्यामुळे व्यायामानंतर शरीराला एनर्जी प्रदान करण्यासाठी तुम्ही अंड्याचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्ही उघडलेली अंडी, हाफ फ्राइड अंडी किंवा ऑम्लेट खाऊ शकतात. व्यायामानंतर अंड्याचे सेवन केल्याने स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

काळे चणे (Black chickpeas-For Post Workout Snacks)

शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला एनर्जी प्रदान करण्यासाठी तुम्ही व्यायामानंतर काळ्या चण्यांचे सेवन करू शकतात. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळून येतात, जे आपल्या शरीराला एनर्जी प्रदान करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही उकडलेल्या काळ्या चण्यांचे सेवन करू शकतात.

बदाम (Almonds-For Post Workout Snacks)

बदामामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, आयरन, कॅल्शियम यांचा समावेश आहे. बदामाचे सेवन केल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही व्यायामानंतर भिजवलेले किंवा साध्या बदामाचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Bell Papper Benefits | शिमला मिरचीचे सेवन केल्याने आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ आश्चर्यचकित करणारे फायदे

Amla Benefits | रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Workout Tips | थकवा दूर करण्यासाठी वर्कआउटनंतर करा ‘या’ हेल्दी स्नॅक्सचे सेवन

Green Grapes | हिरव्या अंगुराचे सेवन केल्याने आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Rose Health Benefits | फक्त प्रेमासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या