पाकिस्तानमध्ये एका शेतात अंड्याची लागवड, व्हिडीओ व्हायरल; सत्य जाणून तुम्ही थक्क व्हाल!

अंड्याची लागवड

पाकिस्तानमध्ये एका शेतात अंड्याची लागवड (Egg planting) करण्यात आल्याचे एक व्हिडीओ दाखवण्यात आले आहे, सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हाला हे ऐकायला खूप विचित्र वाटत असले तरी व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची अनेक अंडी दिसत आहेत. एवढेच नाही तर व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की अंड्याची लागवड (Egg planting)  करता येते. एक व्यक्ती तर अंडी फोडूनही दाखवते. तुम्ही थक्क व्हाल. पण या व्हिडीओचे खरे सत्य काय आहे, हे जाणून घेऊया.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की जेव्हा एखादी व्यक्ती उगवलेले अंडे फोडते तेव्हा त्यामध्ये खऱ्या अंड्याप्रमाणेच पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर पडतो. या व्हिडीओमध्ये पुढे असा दावाही करण्यात आला आहे की, या अंड्यांना मोठी मागणी असून त्यांची सहा ते १२ महिने अगोदर बुकिंग करण्यात आली आहे. ही शेती करणारी व्यक्ती मालामाल होत असल्याचे व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कथितपणे अंडी पिकवणारा एक व्यक्ती सांगत आहे की, या शेतीमध्ये एक अंडी तयार करण्यासाठी सुमारे १ ते २ रुपये खर्च येतो, परंतु बाजारात ते ६ ते ७ रुपये किंवा त्याहून अधिक किमतीत विकले जाते. मात्र हे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वास्तविक, व्हिडीओमध्ये दिसणारे शेत खरे आहे पण या शेतात उगवलेले पीक हे अंडे नसून पांढरे वांगे आहेत. जगात वनस्पतींच्या लाखो प्रजाती आहेत, ज्या वेगवेगळ्या आकारांची आणि रंगांची फळे देतात. हे वांगे देखील त्याचाच प्रकार आहे. ही वांगी हुबेहूब अंड्यासारखी दिसतात. याशिवाय शेतकरी ज्याला तोडून दाखवतो ते खरे अंडे आहे पण चतुराईने ते अंडे झाडांच्या मध्यभागी लपवून ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –