तंत्र मटकी लागवडीचे, माहित करून घ्या

एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि आशियाच्या अन्य भागांत तिची लागवड केली जाते. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते.

मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून आणि तिला आच्छादन करून वाढते. ते सु. ४० सेंमी. उंच वाढते. तिच्या जवळजवळ वाढणाऱ्या फांद्यांवर भरपूर लव असते. पाने संयुक्त व त्रिदली असतात; प्रत्येक पिच्छिकेचे ३–५ भाग असतात. अनुपर्णे अरुंद व टोकदार असतात. खोडावर लहान पिवळ्या फुलांच्या मंजिऱ्या लांबट दांड्यावर येतात. शेंगा लहान, गोलसर, २–६ सेंमी. लांब आणि तपकिरी असून त्यात ४–९ बिया असतात. बिया वेगवेगळ्या रंगांच्या असून बहुधा पिवळट तपकिरी, पांढरट हिरव्या किंवा ठिपकेदार काळ्या असतात. परागण कीटकांमार्फत होते.

शिफारशीत जाती –

विदर्भासाठी मोट नं. ८८ (उत्पादन एकरी २-३ क्विंटल)
पश्‍चिम महाराष्ट्रासाठी एमबीएस- २७ (उत्पादन एकरी ३-४ क्विंटल)
मोट नं. ८८ हे वाण भुरी रोगास काही प्रमाणात बळी पडते, तर एमबीएस- २७ हे वाण भुरी रोगास काही प्रमाणात प्रतिकारक आहे.

जमीन –

हलकी – मध्य प्रकारची जमीन, कमी पाणी धारण क्षमतेची, पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होणारी जमीन लागते.
चोपण, क्षारयुक्त, पानथळ जमिनीत मटकीची लागवड करू नये.
कमी पावसाच्या प्रदेशात या पिकाची लागवड मुख्यत्वे केली जाते.

मशागत –

जमिनीची खोल नांगरट करून पावसाच्या आगमनानंतर उभी – आडवी वखरणी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी एकरी ५-६ गाड्या कुजलेले शेणखत टाकून, काडी-कचरा- धसकटे इत्यादी वेचून शेत तयार ठेवावे.

पेरणी कालावधी –

साधारणतः ६०-७० मि. लि. पाऊस झाल्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत पेरणी करावी.
पिकाचा कालावधी ३.५ ते ४ महिन्यांचा आहे. ओलिताच्या शेतात रब्बी हंगामातील हरभरा अथवा गहू पीक घेण्यासाठी या पिकाची वेळेत पेरणी आवश्‍यक ठरते.
उशिरात उशिरा ऑगस्टच्या मध्यापर्यंत या पिकाची लागवड करता येते.

बीजप्रक्रिया –

पेरणीपूर्वी २ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बन्डाझिम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.

पेरणी –

मटकीची पेरणी तिफणीने, सरत्याने, पाभरीने अथवा काकरीच्या साह्याने करतात.
एकरी साधारणतः ५-६ किलो बियाणे लागते.
पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० सें.मी. राखावे. पेरणीची खोली ३-४ सेंमी. राखावी.
सलग पेरणीसाठी मूग, उडीद, सोयाबीनप्रमाणे प्रत्येक चौथी, पाचवी अथवा सहावी ओळ खाली ठेवून, नंतर डवऱ्याच्या फेरीवेळी गाळ पाडून घ्यावा. अशा पट्टापेर पद्धतीमुळे उत्पादनात १५-२० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य होते.

तणनियंत्रण –

तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुरवातीचे ३०-४५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. नंतर पीक पूर्ण शेत व्यापत असल्याने तणांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो. पीक २० दिवसांचे व ३० दिवसांचे असताना डवऱ्याचा फेर द्यावा. यादरम्यान निंदणी करून ओळीतील तणांचा बंदोबस्त करावा.

खत व्यवस्थापन –

पेरतेवेळी एकरी ३० किलो डीएपी व साधारणतः १५ किलो एमओपी द्यावे.
पेरणी वेळी एकरी ८ किलो गंधक दिल्यास फायद्याचे ठरते.

महत्वाच्या बातम्या –