Share

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

Published On: 

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

मेथीदाणे (Fenugreek seeds) आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत.

  • पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात.
  • केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा.
  • मेथीदाणे (Fenugreek seeds)  रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळू-हळू केस गळणे बंद होईल.
  • मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घ्या.
  • मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.
  • मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. सोबतच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते.
  • मेथीदाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)
मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

🕘 संबंधित बातम्या