Share

राज्यातील ‘या’ २ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा दणका; पिकांचे मोठे नुकसान

Published On: 

🕒 1 min read

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely) पडला. तर हवामान अंदाजनुसार रत्नागिरीत जिल्ह्यात ८ जानेवारीला वादळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात दोन तास पडलेल्या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात संत्रा, हरभरा, तूर पिकांना फटका बसला आहे.

नाशिक जिल्ह्याला अवकाळी (Untimely) पावसाने दणका दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा, निफाड, चांदवड, दिंडोरी, तालुक्यांना अवकाळी पावसाने दणका दिला आहे.  तसेच डिसेंबर महिन्यापासून शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, कारण डिसेंबर महिन्याच्या  सुरवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  जोरदार पाऊस झाला. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी ,म्हणजेच २७ डिसेंबर ला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या