Share

काळजी घ्या! राज्यात गेल्या २४ तासात ४४ हजार ३८८ कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ४४,३८८ नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात१२ रुग्णांनी कोरोनामुळे  जीव गमावला आहे.  तर मुंबईत गेल्या २४ तासात १९,७७४ रुग्ण कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. राज्यात  गेल्या २४ तासात  २०७ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात  सांगली जिल्ह्यात सर्वाधिक ५७ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या