आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ हा १० मार्चपासून

‘महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ येत्या १० मार्चपासून मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील ३२ लाख शेतकऱ्यांना होणार असून त्यासाठी २९ हजार कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे.

कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा सहकार मंत्री पाटील यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पूर्वीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना त्रास झाला होता. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. आधार जोडणी असलेल्या बँक खात्यांनाच कर्जमाफी दिली जाणार आहे. त्या दृष्टीने शासकीय यंत्रणा काम करत आहे.

राज्यातील सरपंचांच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार

आतापर्यंत झालेल्या कामकाजात ९७ ते ९८ टक्के बँक खाती आधारशी जोडण्यात आली आहेत. मात्र, एखाद्या वयोवृद्ध शेतकऱ्याच्या बोटांचे ठसे जुळत नसल्यास अशा ठिकाणी पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. याबाबत नेमके काय-काय बदल सुचवले आहेत ते समोर आल्यानंतर त्यावर बोलणे उचित ठरेल, असे सांगून या विषयाबाबत पाटील यांनी सावध पवित्रा घेतला.

महत्वाच्या बातम्या –

‘पवारांनी कधी पाच जिल्ह्यांमधून निवडणूक लढवली आहे का?’ – चंद्रकांत पाटील

राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, चंद्रकांतदादांचे विठ्ठलाला साकडे