शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेतकरी कर्जमुक्तीची तारीख ठरली आणि मुदतही!!

राज्यातील सुमारे लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना एप्रिलपूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून योजनेच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरूवात झाल्यापासून दररोज त्याचा आढावा घेतला जाईल. देशातली सर्वात मोठी आणि अल्पावधीत राबविली जाणारी योजना यशस्वी करून दाखवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि बॅंकेच्या अधिकाऱ्यांना केले. तसेच कर्जमुक्तीच्या याद्या ह्या 21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

कर्जमुक्ती योजनेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ही कर्जमुक्ती राबविताना शेतकऱ्यावर आपण उपकार करतोय, या भावनेतून काम करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही योजना डिसेंबरमध्ये जाहीर केली असून आम्ही या योजनेची अंमलबजावणी ही मार्चपासून करू, असा शब्द त्यांनी शेतकऱ्याला दिला आहे. कर्जमुक्ती ही देशातली सर्वात मोठी योजना असल्याचे सांगून संपूर्ण देशाचे आपल्याकडे लक्ष आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेला सांगितले.

नोंदणीकृत खत विकण्यसाठी कुठलीही मनाई नाही

तसेच कर्जमुक्ती योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर 88 टक्के डेटा अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये सुमारे 36.41 लाख शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपर्यत पीक कर्ज घेतले असून त्यापैकी 32 लाख 16 हजार 278 शेतकऱ्यांची माहिती ही अपलोड झाली आहे. तसेच कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडणीचे प्रमाण 95 टक्के असून  व्यापारी बॅंकांचे 65.53 टक्के तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचे प्रमाण 63.96 टक्के आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी राज्यभरात 8 हजार 184 केंद्र बॅंकांमध्ये सुरू करण्यात येईल. त्यामध्ये अजून 26 हजार 770 आपले सेवा केंद्र, 8 हजार 815 सामाईक सुविधा केंद्र आणि 52 हजार स्वस्त धान्य दुकान अशा 95 हजार 769 केंद्रावर प्रमाणीकरणाची सुविधा आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर

बजाज पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

उडीद डाळ वापरून असा बनवा घरी फेसपॅक