अवकाळी पाऊस आणि गारपिटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; नुकसानीची मंत्र्यांकडून दखल

अवकाळी पाऊस

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार राज्यात या महिन्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह (Untimely rain) गारपिटीने हजेरी लावली.  ५ ,६,७,८,९,१० जानेवारीला राज्यातील अनेक भागात पाऊस पडला, या पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले. तर या पावसामुळे  शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसासह सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी गारपीट व अतिवृष्टी झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Untimely rain) व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.  गोंडपिपरी, जिवती, कोरपना, पोंभुर्णा, मूल, भद्रावती, वरोरा, राजुरा, नागभीड व ब्रह्मपुरी या तालुक्यांत अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले. याची दखल राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली असून, विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Untimely rain)  गहू, तूर, ज्वारी, चना या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी झालेल्या नुकसानाची त्वरित पंचनामे करावे, असे निर्देश  मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –