चामखीळ घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

नेकांना अंगावर चामखीळ (Wart) येतात. काहींना ते अधिक प्रमाणात येतात तर काहींना काही थोड्या प्रमाणात येतात. चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतात.

बटाट्याचा रस: बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने देखील ते हळूहळू कमी होण्यास मदत होते.

अननसाचा रस: चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करुन लावावे.

सफरचंदचं व्हिनेगर: चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर ठरतं.

लिंबाचा रस: लिंबाचा रस चामखिळीवर लावल्याने देखील याची समस्या दूर होते.

लसून: लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या बारीक ठेचून ते चामखिळीवर लावा.

बेकिंग सोडा: चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळीवर देखील फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखिळीवर ती पेस्ट लावा.

महत्वाच्या बातम्या –