तूर डाळीचे दर शंभरी गाठणार

पुणे –  यावर्षी राज्यात अनेक भागात अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. तर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. तर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतातील तुरीच्या (Tur) पिकाला मोठा फटका बसला आहे या पावसामुळे तुरीच्या पिकाचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते शिवाय यामुळे आता सामान्य नागरिक देखील संकटात सापडताना दिसत आहेत.  खरीप हंगामातील डाळवर्गीय पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले. त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याचे दिसत आहे. यामुळे डाळीच्या दरात चढ-उतार कायम होता. यं. त्यामुळे जवळपास सर्वच डाळींचे भाव वाढताना दिसत आहे. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील अनेक भागातील शेतातील बसल्यामुळे तूर (Tur)  डाळीचे दर प्रति किलो शंभरावर जाण्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा फार महत्त्वाचा ठरतो मात्र खरीप हंगामातच अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली आणि खरीप हंगामाची पुरती वाट लावून टाकली. या खरीप हंगामात लावल्या गेलेल्या तुर (Tur)  पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तुरीचे नवीन उत्पादन अद्यापही बाजारात दाखल झालेले नाही आणि नवीन डाळ येण्यास अद्यापही दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. जुन्या डाळीची मागणी कमी झालेली असल्याने सध्या तूर डाळ ८८ ते ९२ रुपये प्रति किलोवर आहे. अमरावती, वाशीम, अकोला येथील दाळ मिलमध्ये तुरीची आवक येण्यात अजून १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत तूर डाळीच्या दरात चढ उतार होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –