शेतकरी आत्महत्येच्या आकड्यात दिवसेन दिवस वाढ

दुष्काळी परिस्थिती तसेच नापिकीला कंटाळून शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. आत्महत्येचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे. बीड जिल्हा हा कमी अवर्षणाचा जिल्हा आहे. दर एक वर्षाआड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असते. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कायम हाल होतात. पिकांना भाव नसल्यामुळे घेतलेले कर्ज, कौटुंबिक गरजा भागविणे देखील जिकिरीचे होते.

संत्री खाण्याचे हे आहेत फायदे नक्की वाचा

याच विवेंचेनतून जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रत्येक वर्षात वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील सहा वर्षांमध्ये १२३४ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे. यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आजच्या तारखेपर्यंत २१६ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हाच आकडा मागील डिसेंबरअखेर १८७ इतका होता.

अखंड हरिनाम सप्ताहात सप्ताह कमिटीच्या वतीने भव्य कृषी प्रदर्शन

प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतक-यांना मदत करण्यासाठी गेल्यावर्षी माजी आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेतून ‘उभारी’ हा प्रकल्प राबविण्यात आला होता. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपये शासकीय मदतीसह कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह इतर विभागातील योजनांचा लाभ देण्यात येत होते. यासाठी मर्यादित कालावधीची मोहीमही राबवण्यात आली. यावेळी बहुंताश कुटुंबाना त्यांच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी विविध योजनांचे लाभ दिले होते. परंतु भापकर हे सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर प्रशासनाकडून योजनेला ब्रेक लागला.