Share

ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन

Published On: 

ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन

🕒 1 min read

मुंबई – राष्ट्रीय ऊर्जा (Energy) संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’चे औचित्य साधून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आज चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. महाऊर्जातर्फे दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा (Energy)  संवर्धन दिवस आणि दिनांक 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ऊर्जा संवर्धन आठवडा म्हणून राज्यात साजरा केला जातो. यानिमित्त ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानाहून ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व चित्रफितीद्वारे दाखवणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखूवन सुरूवात केली. या चित्ररथावर राज्यातील विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयीची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत असून या चित्ररथावर लावलेल्या पोस्टर्सद्वारे सर्वसामान्यांना ऊर्जा (Energy)  बचतीचा संदेश दिला जाणार असून ऊर्जा बचतीचे महत्व पटवून दिले जाणार आहे.

महाऊर्जातर्फे राज्यात ऊर्जा (Energy) संवर्धन आणि ऊर्जा व्यवस्थापन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक योजनेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या योजनेमध्ये 17 विविध क्षेत्रामधून विविध घटक (औद्योगिक, व्यावसायिक इमारती, शासकीय इमारती, लघु व मध्यम उद्योग, एमआयडीसी इ.) सहभागी होतात. 16 व्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांतर्गत एकूण 78 घटकांनी सहभाग नोंदविला असून 46 विजेत्यांची यादी महाऊर्जा संकेतस्थळावर ऊर्जा संवर्धन दिन दि. 14 डिसेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे डॉ.राऊत यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याराजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन

🕘 संबंधित बातम्या