पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ‘अशी’ करा घरबसल्या नोंदणी!

नवी दिल्ली – देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाच्या या संकटकाळात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान (PM-Kisan)  योजनेचा दहावा हप्त्या कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, मात्र  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत  (Prime Minister Kisan Sanman Nidhi Yojana) दहावा हप्ता 15 ते 25 डिसेंबर दरम्यान  शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.

पंतप्रधान किसान (PM-Kisan) योजनेचे आत्तापर्यंत  9 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तर आता या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा दहावा हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही PM Kisan संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ वर जा. यानंतर Farmers Corner’ अंतर्गत ‘Beneficiary Status’वर क्लिक करा. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. हे केल्या नंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल का याची माहिती मिळेल.  प्रधानमंत्री किसान योजना

पंतप्रधान किसान योजनेचे पुढीलप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा –  यासाठी प्रथम तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. नंतर त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल. त्यानंतर शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.  मग त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

महत्वाच्या बातम्या –