मराठवाड्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण

लातूर : गभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

संपूर्ण जगामध्ये ओमायक्रॉन (Omycron) या विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्र राज्यातही ओमायक्रोनच्या (Omycron)  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आत्तापर्यंत राज्यातील डोंबिवली, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये ओमायक्रोनचे रुग्ण आढळून आले होते. मात्र आता मराठवाड्यातही ओमायक्रॉनने (Omycron) शिरकाव केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. मराठवाड्यातील लातूर मध्ये ओमायक्रोनचा रुग्ण आढळून आला आहे..

हाय रिस्क देशातून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. आणि या तपासणीमध्ये हा व्यक्ती ओमायक्रोनबाधित आढळून आला आहे. मात्र यामध्ये लक्षणे अगदी सौम्य प्रकारची आहेत. सदर व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. लातूर मध्ये ९४ नागरिक हे परदेशातून आले होते. त्यामधील या व्यक्तीला ओमायक्रोनची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अधिकारी सतर्क झाले असून या ९४ जणांपैकी काहीजण शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून आलेले आहेत. तर उर्वरित नागरिक हे कमी जोखमीच्या देशातून आलेले आहेत.

या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामधून एक व्यक्ती पॉझिटीव्ह आला. या व्यक्तीचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये पाठविण्यात आले होते. त्यामध्ये सोमवारी या व्यक्तीचा रिपोर्ट ओमायक्रोन बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीमध्ये लातूर मधील कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून संपूर्ण प्रकारची काळजी घेतली जात आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –