जाणून घ्या मखाना खाण्याचे फायदे

सर्रास काहीही खाण्यापेक्षा थोडं हलकं फुलकं खाण्याकडे लक्ष केंद्रीत केलं जाऊ लागलं आहे. यामध्ये भारतात पूर्वापार खाल्ला जाणारा मखाना म्हणजे कमळाचं बी पुन्हा एकदा डाएटमध्ये सहभागी झाला आहे. मखाना खाल्यामुळे आरोग्य चांगल राहतच पण त्याचबरोबर हे 6 फायदे होतात.

चक्रधर बोरकुटे यांनी सेन्सरची केली निर्मिती

मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो.

रात्री झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं

उच्च रक्तदाबावर देखील नियंत्रण येते मानसिक ताण, राग येणे यावर अंकूश येतो याच्या सेवनाने कारण हे कमळापासून तयार झालेले थंड प्रक्रुतीचे बीज आहे. चेहरा तजेलदार होतो याच्या सेवनाने, कारण यात व्हिटॅमीन 3 मुबलक असते. सुरकूत्या गायब होतात. दैनिक आहारांत किमान २५ ग्रँम मखाना रोज खायला हवे. बाळंतिणीला पौष्टिक आहार म्हणून खिर, लाडु, वैगेरे स्वरूपात खायला देतात.