चुकीचा वापर होऊ नये म्हणून ‘आधार कार्ड’ करा लॉक !

भारतात आता आधार कार्ड नसेल तर आपण काही हि करू शकत नाही. अगदी छोटी गोष्ट करायची असल्यास आधार कार्ड असणे आवश्यक बनले आहे. पण त्याची काळजी म्हणजेच ते (safe) सुरक्षित रहावे म्हणून तुम्ही आता आधार कार्ड लॉक करू शकता.. हो तुम्ही लॉक करू शकता .
कोणीच करू शकत नाही तुमच्या Aadhaar card चा चुकीचा वापर, असं करा Lock

अश्या पद्धतीने करा आधार कार्ड लॉक…(This is how to lock Aadhar card …)

१ )आधार कार्ड लॉक करण्यासाठी सर्वात आधी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरुन 1947 वर GETOTP मेसेज लिहून पाठवावा लागेल.

२ ) मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल.

३ ) तुम्हाला पुन्हा 1947 या नंबरवर ‘LOCKUID आधार नंबर’ आणि हा OTP लिहून पाठवायचा आहे. अशाप्रकारे तुमचं आधार कार्ड लॉक होईल.

आधार कार्ड Aadhaar Card Unlock कसे करायचे ?

१ )लॉक आधार कार्ड पुन्हा अनलॉक करण्यासाठी तुमच्या मोबाइल नंबरवरुन 1947 या नंबरवर GETOTP असा मेसेज पाठवा.

२ )मेसेज पाठवल्यानंतर मोबाइलवर एक OTP येईल. तुम्हाला ‘UNLOCKUID आधार नंबर’ आणि OTP लिहून 1947 वर मेसेज पाठवावा लागेल.

आता तुमचं आधार कार्ड अनलॉक होईल.

ऑनलाईन (Online) ह्या पद्धतीने करू शकता …

१ )  UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in वर क्लिक(Click) करा.

२ )त्यानंतर Aadhaar Service कॉलममध्ये Aadhar Paperless Offline E-KYC च्या खाली lock/unlock biometric वर क्लिक(Click) करा.

३ ) नवीन पेज ओपन होईल. त्यावर स्क्रोल करुन खालच्या बाजूला जा आणि Confirm वर क्लिक(Click) करा.

४ )त्याखाली lock/unlock biometric वर क्लिक(Click) करा. आता कॅप्चा कोडसाठी पेज ओपन होईल.

५ ) इथे 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून Send OTP वर क्लिक(Click) करा.

६ )तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकून सबमिटवर क्लिक(Click) करा.

महत्वाच्या बातम्या –