Share

हाडे मजबुत करण्यासाठी मशरुम आहे उपयोगी, जाणून घ्या फायदे

Published On: 

🕒 1 min read

मशरुम म्हटलं की अनेकांचे चेहरे वाकडे-तिकडे होतात. खुप कमी लोकांना मशरुम आवडतं. मात्र मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते, त्यामुळे वय वाढण्याची गती असते ती कमी होते.  सुख किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपामध्ये मशरूम खाता येते. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आपण अनेक उद्योग करत असतो. मग त्यात आजपासून जेवणात मशरुमचा समावेश करा… जाणून घेऊयात मशरूमचे आरोग्यदायी फायदे….

  • मशरूममध्ये कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. त्यामुळे आरोग्य चांगलं राहू शकतं. म्हणुन रो़जच्या जेवणात थोडं तरी मशरुम खाणं गरजेचं आहे.
  • मशरूम खाण्यामुळे वजन आणि ब्लड शुगर वाढत नाही. कारण मशरूममध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात.
  • मशरूममध्ये क जीवनसत्व असल्यामुळे स्कर्व्ही रोगापासून बचाव होतो.
  • मशरूमचा उपयोग हा पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी होतो.  कारण मशरूममध्ये तंतुमय पदार्थ व फॉलिक ऍसिड हे घटक मोठ्या प्रमाणात असतात.
  • मशरूममध्ये जास्त प्रथिने व ऊर्जा कमी असते. त्याचा फायदा हा मधुमेही व्यक्तींना होतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्याचे घटक मशरूम मध्ये असतात.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या