म्हशीच दुध आरोग्यासाठी आहे फायदेशीर; वाढते रोगप्रतिकारक शक्ती

दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक अगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा  म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज दूर होणार आहे. दरम्यान देशाच्या अनेक भागात अनेक जातीच्या म्हशी पाळल्या जातात. या म्हैशींची दूध देण्याची क्षमता वेगवेगळी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, म्हैशींच्या दुधात अनेक विविध घटक आहेत जे आपल्या शरिरासाठी पोषक आहेत.  हाडांची मजबूती वाढविण्यासाठी म्हैशीचे दूध खूप उपयुक्त आहे. यासह हृद्य, वाढ, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही म्हैशीचे दूध फायदेकारक आहे. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • म्हशीच कोमट दूध प्यायल्याने शरीरातील स्नायू शिथिल होण्यास मदत होते. स्नायू शिथिल झाले की शांत आणि चांगली झोप लागते. त्यामुळे झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे गाढ झोप लागण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तुम्हाला शांत झोप येत नसेल तर दूध प्या, नक्कीच फायदा होईल.
  • म्हशीच्या दूधामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित राहील्यास हृदयावर ताण येत नाही आणि हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवण्यापासून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे हृदयाचे कार्य चांगले रहावे यासाठी झोपताना दूध प्यायलेले फायदेशीर ठरते.
  • रात्री झोपताना म्हशीच दूध प्यायले तर तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास रात्री झोपताना दूध पिणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. प्रक्रिया केलेले दूध पिणे जास्त चांगले. मात्र झोपताना दूध पित असाल तर ते एक ग्लासहून जास्त नसेल याची काळजी घ्या.

महत्वाच्या बातम्या –