भाजण्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

घरातली छोटी-मोठी कामे करताना बऱ्याचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात काम करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. त्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा –

कोरफड – 

कोरफडीमुळे भाजलेल्या जागेला मऊपणा येऊन लवकर बरे वाटते. म्हणून भाजलेल्या जागेवर कोरफडीचा गर लावावा. कोरफडीचा मऊपणा आणणारा व त्वचा पूर्ववत करणारा गुणधर्म भाजलेल्या जागी थंडावा मिळण्यास मदत करतो. कोरफडीचा गर जखमेवर चिकटून राहत नाही, त्यामुळे कोरफडीचा ताजा गर जखमेवर ठेऊन बांधावा. कोरफडीच्या ताज्या गरामुळे भाजलेली वेदनादायी जखम लवकर बरी होते व भाजल्याचे डागही राहत नाहीत.

मध –

भाजल्यावर प्रथमोपचार म्हणून मध लावतात, हे अनेक जणांना माहीत असते. मध लावल्यामुळे जखम लवकर बरी होऊन डाग पडण्याची शक्यता कमी होते. मध उत्तम अँटि-सेप्टिक असल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

सौम्य व्हिनेगर –

अनेक जणांच्या घरात व्हिनेगर असते. त्यामुळे हा घरगुती उपाय करणे अगदी सोपे आहे. सौम्य व्हिनेगरमध्ये एक कापड भिजवून ते भाजलेल्या ठिकाणी लावावे. जखम बरी होईपर्यंत शक्य तितक्या वेळा कापड व्हिनेगरमध्ये भिजवून लावत रहावे.

सौम्य लव्हेंडर ऑइल –

वेदना कमी करण्यासाठी हेही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. सौम्य लव्हेंडर ऑइलमध्ये कोरफडीचा गर मिसळून भाजलेल्या ठिकाणी लावावा. कोरफडीच्या गरातील ‘व्हिटॅमिन सी’ आणि लव्हेंडर ऑइलमधील ‘व्हिटॅमिन इ’ एकत्र आल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण जखमेवर दिवसभर लावून ठेवावे.

केळ्याची साल –

केळ्याची साल पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजलेल्या ठिकाणी ठेवावी. जखम थंड होऊन लवकर बरी होण्यास मदत होते. भाजलेल्या जखमा बऱ्या करण्यास केळ्याची साल उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

दही –

भाजल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासानंतर जखमेवर दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑइल –

भाजलेल्या जखमवेर ऑलिव्ह ऑइल लावल्यासही आराम मिळतो.

थोडेफार भाजले असल्यास घरगुती उपचार करावेत. परंतु जास्त भाजल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

भाजण्याप्रमाणेच पावसाळ्यात होणाऱ्या शू बाइट्सवर घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

महत्वाच्या बातम्या –