अबब ! शेतकरी कृषिपंपांचे एवढे अर्ज ‘वेटींग’वर

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हवा तसा पाऊस नसल्याकारणाने शेतीवर त्याचा परिणाम होत आहे. पाऊसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक हे निसटण्याचे चित्र बघायला मिळत आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर सिंचनाची मदत घेऊन शेती वाचविण्याची पाळी  येते. पण सिंचनाची मदत म्हणजे त्यासाठी कृषी पंपाची गरज पडते. आता यासाठी शेतकरी पाण्याची सोय करून घेण्यासाठी पुढे येत आहेत. शेतकरी आपल्या कृषीपंपांना अधिकृत वीज मिळावी यासाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करत आहेत.

कर्जमाफीच्या यादीत नावे तर आली, पण माणूस कुठून आणायचा?

पण त्यांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाच्या उच्च दाब प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यायची यासाठी जिल्ह्यातील २२१५ शेतकऱ्यांची यादी महावितरणने ३१ मार्च २०१८ पर्यंत गोठविली आहे. यामुळे आजही जिल्ह्यातील २२०४ शेतकरी कृषीपंप जोडणीसाठी ‘वेटींग’वरच आहेत.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई देणार – अजित पवार

शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठीची डिमांड भरूनही आपल्या नंबरची वाट पाहावी लागत आहे. त्यासाठी त्यांना वीज कंपनीच्या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यात विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांनी डिमांड भरली असूनही त्यांना वीज जोडणीसाठी महावितरणच्या चकरा माराव्या लागत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

या सरकारला त्यांची जागा दाखवून देणार – राम शिंदे

नागरिकांना मोफत वीज देण्यास अजित पवारांचा विरोध; असले फुकटचे धंदे करू नका