Share

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

Published On: 

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

🕒 1 min read

कांद्याच्या भावात सध्या विक्रमी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची घसरण झालीय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण पंधरा हजाराच्या आसपास कांद्याची अवाक झाली आहे. बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. चार दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

विद्यार्थ्यांनी केले कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम झाला असल्याचे बोलेले जात आहे. परदेशातून आयात केलेला कांदा अजूनही जेएनपीटी बंदरात पडून आहे. पण सध्या राज्यातल्या कांद्याचीही आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका महिन्यात जवळपास साडेसहा हजाराच्या क्विंटलच्या आसपास भाव कमी झाला आहे.

रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता

सरकारने निर्यात बंदी लवकरात लवकर न उठवल्यास भावात अजून घसरण होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. मनमाड,लासलगाव, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळणार आहे.कांद्याला आज सरासरी प्रति क्विंटल १८०० रुपये भाव मिळाला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याबाजारभाव (Market Prices)भाजीपाला (Vegetables)

Join WhatsApp

Join Now
कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

🕘 संबंधित बातम्या