‘खरबूज’ खाल्ल्याने दूर राहातील ‘हे’ आजार, जाणून घ्या

पिवळसर रंगाचे रसदार, चवदार व थंड असे खरबूज म्हणजे निसर्गाने उन्हाळ्यासाठी आपल्याला दिलेले एक वरदानच म्हणायला हवे. इंग्रजीमध्ये मस्कमेलन, संस्कृतमध्ये खरबुजा तर शास्त्रीय भाषेत कुकुमिस मेलो या नावाने हे फळ ओळखले जाते.  हे फळ लंबगोल, अंडाकार, पिवळे, चट्टय़ा-पट्टय़ांचे, गोड व थंड असे फळ आहे. एक वेगळ्या प्रकारचा सुगंधही त्याला असतो. चला तर जाणून घेऊ फायदे…

  • खरबूज हे शीत गुणधर्माचे फळ असल्यामुळे उष्णतेचे विकार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • खरबुजाचे नियमित सेवन किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
  • खरबुजामध्ये एंडीनोसीन नावाचे तत्त्व असते. जे शरीरात रक्ताची गुठळया होऊ देत नाही. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो
  • खरबूज खाल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
  • नियमित खरबुजाचे सेवन केल्याने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो
  • खरबूज रोज भरपूर प्रमाणात खाल्ल्याने त्यात असणाऱ्या उष्मांकामुळे वजन वाढीस लागते. म्हणून कृश व्यक्तींनी सुडौल बांधा होण्यासाठी नियमित खरबूज खावे.

महत्वाच्या बातम्या –