कांद्याचे भाव घसरले , लासलगाव आणि पिंपळगावात आवकही घटली

कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या, नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याचे भाव सरासरी 450 रुपयांनी घसरले. काल कांद्याला प्रति क्विंटल 1 हजार 201 ते 3 हजार 13 रुपये इतका भाव मिळाला.

गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा गडगडला. दुसरीकडे मात्र बंगळूरच्या बाजारपेठेत उन्हाळ आणि नव्याने आवक सुरू झालेल्या कांद्याचे भाव स्थिरावलेले आहेत.

पिंपळगांव बसवंत बाजार समितीमध्ये आवक अतिशय कमी होती. ५१९ वाहनांमधून कांदा आणण्यात आल्याचे दिसून आले.

असा मिळाला कांद्याला भाव (रुपयांमध्ये)

बाजार समिती किमान कमाल सरासरी

लासलगाव १२३१ ३२६३ २८००

पिंपळगांव बसवंत २२७० ३४७१ २८५१

महत्वाच्या बातम्या –

सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे सौरऊर्जेवर आणणार – चंद्रशेखर बावनकुळे

‘पवारांनी कधी पाच जिल्ह्यांमधून निवडणूक लढवली आहे का?’ – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१२८.४१ मिमी पावसाची नोंद