Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी – राहुल गांधी

Published On: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी – राहुल गांधी

🕒 1 min read

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची नोंद नसल्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना राहुल गांधी म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी.’तसेच आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या पाचशेंहून अधिक शेतकऱ्यांची सोमवारी संसदेत यादी सादर करून सरकारकडे भरपाईची मागणी करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुढे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की,’एका दिवसापूर्वी सरकारने म्हटले होते की, आमच्याकडे शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचा आकडा नसल्याने भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी यांनी पंजाब सरकारकडून आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचा तपशील मागावला असून यामध्ये ५०४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५-५ लाख रुपयांची भरपाई दिली असून १५२ कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. इतरांनाही लवकरच नोकरी दिली जाणार आहे. तसेच राहुल यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या ५०४ शेतकऱ्यांची नावे, पत्ता आणि फोन नंबरसह यादी जारी करून ही यादी सोमवारी संसदेत सादर करून हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
राजकारण (Politics)बातम्या

Join WhatsApp

Join Now
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी – राहुल गांधी

🕘 संबंधित बातम्या