Share

थंडीच्या दिवसांत शरीरासाठी फायदेशीर आहे तिळ, जाणून घ्या फायदे

Published On: 

🕒 1 min read

थंडीच्या (Cold) दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत (Cold)  तिळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तिळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते.

  • थंडीच्या (Cold) दिवसांत तिळाचं तेल त्वचेवर लावल्याने त्वचेवरील रखरखीतपणा दूर होतो. तिळाच्या सेवनाने चेहरा चमकदार होण्यास मदत होते.
  • पोटात दुखत असल्यास काळे तीळ गरम पाण्यासोबत खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.
  • तिळामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे तणाव, डिप्रेशनच्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळू शकते.
  • तीळ आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने सुक्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
  • तिळात सेसमीन नावाचे एन्टीऑक्सिडेन्ट आढळतात जे कॅन्सर पेशी वाढण्यापासून बचाव करतात.
  • तिळाच्या सेवनामुळे भूक वाढते. तीळ वात, पित्त आणि कफची समस्या कमी करण्यास मदत करते.
  • तिळाच्या तेलाने सतत मालिश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.
  • कान दुखत असल्यास तिळाच्या तेलात लसून एकत्र करुन, तेल हलकं गरम करुन लावल्यास कानदुखी कमी होऊ शकते.
  • तिळाचं सेवन दातांसाठीही गुणकारी ठरतं. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्याने दात मजबूत होण्यास फायदा होतो.
  • सतत तोंड येत असल्यास तिळाच्या तेलात सेंधव मीठ मिसळून लावल्यास आराम पडू  शकतो.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)आरोग्यविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या