जाणून घ्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे

भुईमुगाच्या शेंगा उकडवून त्यातील मऊ मीठ लावलेले शेंगदाणे खाण्यात मजा असते. यामध्ये प्रोटीन, ओमेगा – 3, ओमेगा – 6, फायबर आणि विटामिन ई सारखी अनेक पोषक तत्त्व आढळतात, जी शरीराला अधिक निरोगी ठेवतात. याशिवाय भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत.

-भुईमुगाच्या शेंगा मधुमेहींसाठी चांगल्या आहेत. मधुमेहामध्ये साखर नियंत्रणात राहणे आवश्यक आहे. शरीरातील रक्तामधील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच हे शेंगदाणे खाल्ल्यानंतर शरीरातील साखरेच्या पातळीमध्येही सुधारणा होते. नियमित सेवन केल्यास, त्याचा साखरेवरील नियंत्रण आणण्यात होणारा फायदा नक्कीच दिसून येईल.

दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं – बच्चू कडू

-भुईमुगाच्या शेंगामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे अधिक असते. साधारण १०० ग्रॅम भुईमुगामध्ये २६ ग्रॅम प्रोटीन मिळते. शारीरिक वाढीसाठी हे अत्यंत आवश्यक असते. कोणत्याही कारणाने दूध पित नसाल तर त्यासाठी भुईमुगाच्या शेंगा हा उत्तम पर्याय आहे. दुधाऐवजी या शेंगा खाल्ल्यात तर त्याचप्रमाणात प्रोटीन मिळते.

-भुईमूग हे शरीराला पोषण देण्यासह हृदरोगासंबंधित होणाऱ्या आजारापासून दूर ठेवायला मदत करते. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट आढळतात. जे हार्टअटॅक थांबवण्यासाठी आवश्यक घटक आहेत. तसेच शरीरातील वाईट काेलेस्टेरॉल कमी करण्याचं कामही भुईमूग करतात. त्यामुळे आहारात नेहमी हे शेंगदाणे वापरायला हवेत. तयार शेंगदाणे बाजारातून आणण्यापेक्षा भुईमुगाच्या शेंगा आणून त्यातील शेंगदाणे काढून खाण्याने याचा जास्त फायदा होतो. हे अतिशय पौष्टिक असतात.

जाणून घ्या कंटोळीचे फायदे…

-गरोदर महिलांनाही भुईमुगाच्या शेंगदाण्याचा फायदा मिळतो. यामध्ये फोलेक नावाचं तत्त्व असून याचे प्रमाण जास्त असते. जे शरीराच्या नसांमध्ये विभाजन करण्यास मदत करतं. तसेच फोलेट गर्भाच्या आतील बाळाच्या मेंदूसंबंधी समस्या होण्यापासून दूर ठेवण्याचं काम करते. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही योग्य प्रमाणात भुईमुगाच्या शेंगा खाऊ शकता.

-यात जास्त प्रमाणात फॅट असले तरीही वजन कमी होऊ शकते. भुईमुगाच्या शेंगदाण्यात असलेले प्रोटीन आणि फायबर यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. हे खाल्ल्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट मिळते. त्यासाठी भुईमुगाचे शेंगदाणे खाल्ले की लगेच पोट भरल्यासारखे वाटते.