Share

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता

Published On: 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता

🕒 1 min read

नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan)  योजनेचा दहावा हप्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला गेला आहे.  १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केला गेला आहे.  या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या वार्षिक रकमेत वाढ होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्‍यांना वार्षिक 6,000 रुपये देते. आता या बजेटमध्ये ही रक्कम वाढवली जाऊ शकते. यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्‍यांना वार्षिक 6,000 रुपये देते मात्र आता ही रक्कम आता ८००० एवढी केली जाऊ शकते. देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर देशातील शेतकर्‍यांचा शेतीचा खर्च वाढला आहे. डिझेल ते खते आणि बियाणांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहे.  तसेच शेतकऱ्यांवर अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. यामुळे याबाबत मोदी सरकार विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान किसान योजनेचे पुढीलप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा –  यासाठी प्रथम तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. नंतर त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल. त्यानंतर शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.  मग त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर तुम्ही Get Report’ वर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या 
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही PM Kisan संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ वर जा. यानंतर Farmers Corner’ अंतर्गत ‘Beneficiary Status’वर क्लिक करा. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. हे केल्या नंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल का याची माहिती मिळेल.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या

Join WhatsApp

Join Now
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता

🕘 संबंधित बातम्या