गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

भारतीय संकृतीमध्ये गुळ-पाणी याला खूप महत्व होते. मात्र, आधुनिक जीवनशैलीतील साखरेच्या अतिक्रमणात सध्या चहाला मोठे महत्व आले आहे. मात्र, गुळ असो की साखरेचा चहा. दोन्हीचे काही फायदे आहेतच. संवादाचे साधन बनलेल्या चहामुळे जीवनात गोडी आणखी वाढते. फ़क़्त त्याचा अतिरेक मात्र टाळावा.

साखरेपेक्षा गुळामध्ये जास्त जीवनसत्व व पोषक घटक असतात. गुळ गरम पदार्थ असल्याने सर्दी-पडस्यापासूनही आराम मिळतो. मात्र, कडक उन्हात शक्यतो गुळाचा चहा टाळावा. पावसाळी वातावरण किंवा थंडीत मात्र, नियमितपणे गुळाचा चहा पिण्याची गरज आहे. याचे इतरही काही फायदे आहेत. त्यामुळेच अजूनही आदिवासी लोक किंवा विदर्भातील ग्रामीण भागात गुळाच्या चहाला आदरातिथ्यमध्ये महत्वाचे स्थान आहे.

गुळाचा चहा पिल्याने पाचकरस सक्रीय होऊन बद्धकोष्ठता कमी होते. एनिमियाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी हा चहा उपयोगी ठरतो. टाॅक्सीन दूर होऊन चेहऱ्याचा रंग उजळतो. यातील पोटॅशिअममुळे हार्ट प्रॉब्लेम्स दूर होतात. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते. जाॅइंट पेन कमी होण्यासह कमजोरी दूर करण्यासाठी गुळाचा चहा नक्कीच उपयोगी ठरतो.

महत्वाच्या बातम्या –