Share

‘या’ आजारांवर गुणकारी टोमॅटो, जाणून घ्या

Published On: 

🕒 1 min read

टोमॅटोशिवाय कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा (Tomatoes) वापर आपण भाजी म्हणूनच करतो, पण खरं तर हे एक फळ आहे. लाल टोमॅटो (Tomatoes)  जितके दिसायला सुंदर असते, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहे. भारतात टोमॅटोची (Tomatoes) सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. खाण्याशिवाय वजन कमी करण्यामध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे. जाणून घ्या सहज उपलब्ध असणाऱ्या टोमॅटोचे (Tomatoes) फायदे.

  • टोमॅटोचे (Tomatoes) सेवन वाढत्या वजनाला आटोक्यात आणू शकते. खरं तर यामध्ये खूप कमी प्रमाणात चरबीसोबतच जीरो काेलेस्टेरॉल असते, जे वजन वाढू देत नाही. टोमॅटोमधील भरपूर पाणी आणि फायबरमुळे विना कॅलरीज पोट भरण्यास मदत होते. त्यामुळे भूक कमी लागते.
  • टोमॅटोच्या (Tomatoes) औषधीय गुणांमुळे कॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही बचाव होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन नामक घटक भरपूर प्रमाणात आढळतो, जो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर रोखण्यास फायदेशीर आहे. कॅन्सर कमी करण्याऱ्या लायकोपीन या तत्त्वाशिवाय टोमॅटोमध्ये नियासीन, व्हिटॅमीन बी 6, पोटॅशियम यांसारखी तत्त्वही असतात. ही सर्व तत्त्व हृदयासाठी फायदेशीर मानली जातात. सर्वेक्षणानुसार, नियमितपणे आठवडाभर 10 टोमॅटोचे सेवन केल्यास कॅन्सर होण्याची शक्यता जवळपास ४५ टक्क्यांनी कमी होते. प्रत्येकाच्या स्वयंपकघरात टोमॅटो हा असतोच.
  • प्रत्येक भाजी आणि आमटीची चव वाढवण्यात टोमॅटोचा (Tomatoes)सर्रास वापर होतो. प्रत्येक भाजीच्या वाटणासाठी कांदा, लसूण, आलं आणि मसाल्यांसोबत टोमॅटोचा वापर करायलाच हवा. यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि रंगही छान येतो.टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम आढळते, ही दोन्ही तत्त्वे हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरुस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसेच टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या