तुरीची खरेदी कमी दरात करून हमीभावाने विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक

तुरीची खरेदी कमी दरात करून त्याची शासकीय केंद्रावर हमीभावाने विक्री करणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून  एक कोटी ४१ लाख ८२ हजार ८६३ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.धर्मेद्र ढोले , महेश ऊर्फ महेश्‍वर भोयर अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

टॅटू काढताना अनेक गोष्टींची घ्या काळजी, योग्य काळजी घेतली नाही तर…..

या प्रकरणी १३ ऑक्‍टोंबर २०१८ रोजी दारव्हा पोलिसात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, दोन व्यापाऱ्यांनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून कमी किमतीमध्ये तुरीची खरेदी केली. त्यानंतर ती तूर दारव्हा बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघात नाफेडला जादा दराने विकली. या माध्यमातून शासनाची १ कोटी ४१ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी दारव्हा पोलिसात या दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

स्विगी ऍपने प्रदर्शित केली ग्राहकांच्या फेव्हरेट फूडची यादी

त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायलायात जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. तेव्हापासून दोन्ही व्यापारी फरार होते. त्यांच्या अटकेचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांनी आरोपींची शोधमोहीम राबवीत त्यांना अटक केली.