उन्हाळ्यात उसाचा रस पिताना ‘ही’ काळजी घ्यावी, जाणून घ्या

पहाटे थंडी जाणवत असली तरी दुपारी मात्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. उधुनमधून पावसाळी वातावरण राहत असल्याने अद्याप तरी कडक उन्हाचा सामना करावा लागला नाही. उसाचा रस विकणाऱ्या गाड्यांवर ग्राहकांची चांगलीच गर्दी होत आहे.

मात्र, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे? हे अनेकांना माहिती नाही. तेव्हा उसाच्या रसाचे फायदे आणि उसाचा रस पिताना घ्यावयाची काळजी जाणून घेऊया. उसाच्या रसाचे असे अनेक फायदे आहेत मात्र काही लोकांसाठी हा रस नुकसानकारक ठरु शकतो.

तसेच तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर ऊसाचा रस पिणे शक्यतो टाळा. कारण उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असते. उसाच्या रसात मोठ्या प्रमाणात कॅलरी तसेच कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे शरीराचे वजन वाढू शकते. तुमची ब्लड शुगर लेव्हल अचानकपणे वाढत असेल तर उसाच्या रसाचे सेवन करु नये. तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर ऊसाचा रस पिणे शक्यतो टाळा.

दरम्यान, रस बनवण्यासाठी वापरणारे पाणी स्वच्छ आहे का? हे तपासा. बर्फ नीट ठेवले आहे का? त्यावर माशा तर बसत नाहीत ना? याकडे लक्ष द्या. तसेच फ्रिजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिणे टाळा. एका दिवशी दोन किंवा तीन ग्लासच्यावर रस पीऊ नका, अशी अनेक प्रकारची काळजी उसाचा रस पिताना घ्यावी.

महत्वाच्या बातम्या –