डेंग्यूवर पपईच्या पानांचा रस का फायदेशीर असतो?

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ).हा ताप जर हाताबाहेर गेला तर मात्र रुगांचा मृत्यू निश्चित आहे. कारण या आजारात रूग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्स अतिशय वेगाने कमी होऊ लागतात. तुम्हाला माहित असलेच की प्लेटलेट्स शरीरासाठी किती गरजेच्या आहेत. यामुळे डेंग्यू हा जीवघेणा आहे.

पण यावर पपईची पाने हे खूप फायदेशीर ठरतात. चला तर मग जाणून घेऊयात पपईची पाने हे खूप फायदेशीर आहे……

पपईच्या पानांमध्ये जीवनसत्त्व ‘क’ आणि अँटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. तुम्हाला माहित असेलच की जीवनसत्त्व क आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती अर्थात इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. तर अँटीऑक्सीडेंट्स हे विषाणू आणि जंतू नष्ट करण्याचे काम करतात. त्यामुळे डेंग्यूवर पपईची पाने अतिशय रामबाण ठरू शकतात. अनेक तज्ञ आणि जाणकार सुद्धा पपईचा पानांचे हे महत्त्व जाणून असल्याने हा उपाय ट्राय करण्याचा सल्ला आवर्जुन देतात.

तसेच डेंग्यूवर उपचार म्हणून पपईच्या पानांचा ज्यूस तयार करावा लागतो. याची चव काहीशी कडू असू शकते. ती चव सुधारण्यासाठी तुम्ही यामध्ये मध किंवा दुसऱ्या फळांचा ज्यूस काही प्रमाणात मिसळू शकता.

महत्वाच्या बातम्या –