Share

राज्यात आज पाऊस कुठं होणार? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

Published On: 

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या होत्या. जून महिन्याच्या प्रारंभी दाखल झालेल्या मान्सूनने बराच काळ विश्रांती घेतली. त्यानंतर सध्या पावसाची उघडीप चालू असल्याचे दिसत आहे.

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना या महिन्यात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात  जोरदार पाऊस होण्याची शक्यात असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ५  ते ६ सप्टेंबर यादरम्यान राज्यात पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार आहे. तर राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडणार असून या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)हवामान

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या