Share

‘या’ जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस; तूर, कपाशी पिकांचे मोठे नुकसान

Published On: 

‘या’ जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस; तूर, कपाशी पिकांचे मोठे नुकसान

🕒 1 min read

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६,७,८ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार अमरावती जिल्ह्यात ८ जानेवारीला गारपिटीसह वादळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडला. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कपाशी, पिकांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात आजीनं २ दिवस जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच डिसेंबर महिन्यापासून शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, कारण डिसेंबर महिन्याच्या  सुरवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  जोरदार पाऊस झाला. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी ,म्हणजेच २७ डिसेंबर ला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या

Join WhatsApp

Join Now
‘या’ जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस; तूर, कपाशी पिकांचे मोठे नुकसान

🕘 संबंधित बातम्या