Share

काळजी घ्या! देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल 27 टक्क्यांनी वाढ; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. भारतात एकाच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे,

तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (corona ) 16,700 नवीन रुग्ण आढळले आहेत.  220 लोकांचा मृत्यू झाला  एका दिवसांत 27 टक्क्यांनी रूग्णसंख्येत वाढ झालीय. गेल्या 71 दिवसांतली सर्वाधिक रूग्णसंख्या आहे. ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या जवळपास 1270 जवळ पोहोचली आहे. 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. महाराष्ट्रात 450, दिल्लीत 320 आणि केरळमध्ये 109 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

देशात सध्या   91 हजार 361  सक्रिय रुग्ण आहेत. तसेच  3 कोटी 42 लाख 66 हजार 363  रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या