ऊसतोड मजुराचा मोठा विक्रम! एकट्या ऊसतोड मजुराने एका दिवसात तोडला 16 टन ऊस

सांगली –  एका ऊसतोड मजुराने एक मोठा विक्रम केला. एका ऊसतोड मजुराने (Sugarcane laborer) एकट्याने एका दिवसात तब्बल २० गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम मोठा विक्रम केला आहे. या ऊसतोड मजुराचे नाव ईश्वर रामचंद्र सांगोलकर आहे.  यांनी एकट्याने एका दिवसात तब्बल वीस गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम मोठा विक्रम केला आहे. सांगली जिल्ह्यात वारणा साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम सुरू आहे. ईश्वर रामचंद्र सांगोलकर एका दिवसात 16 टन ऊस तोडला आहे. या कामाबद्दल ईश्वर सांगोलकर यांचा सत्कार वारणा साखर कारखाना प्रशासनाने केला.

जत तालुक्यातील खैराव गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील ईश्वर सांगोलकर हा गेल्या पंचवीस वर्षांपासून वारणा साखर कारखाना आणि इतरही साखर कारखान्यात ऊसतोड मजूर (Sugarcane laborer) म्हणून काम करत आहे. ईश्वर यांनी वाळवा तालुक्यासह अनेक तालुक्यात ऊसतोडीचे कामे केली आहेत. मागील पंधरा दिवसांपासून कुंडलवाडी येथे ऊसतोड सुरु आहे. सागर सावंत यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना ईश्वर सांगोलकर यांनी एकट्याने दिवसाकाठी 16 टन ऊसतोड करून एक नवा विक्रम केला आहे.

त्यांनी केलेल्या या विक्रमाची वारणा कारखाना प्रशासनानेही दखल घेतली आहे. कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील, ऊस अधिकारी विजय कोळी शेती, गट अधिकारी अक्षय तोडकर, शेती मदतनीस प्रताप भोसले यांनी ईश्वर सांगोलकर यांचा थेट उसाच्या फडात जाऊन सत्कार केला.

महत्वाच्या बातम्या –