मका पिकासाठी ठिबक सिंचन अधिक फायदेशीर; जाणून घ्या कसे ते…….

मका पिक

तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते. अन्नधान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिमरबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरीता होतो

मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे. मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से तापमान चांगले असते. परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो.

खरिपातील मका पीक पावसावर अवलंबून असल्याने या पिकास फुलोऱ्यावर असताना, दोन पावसांमध्ये मोठा खंड पडल्यास दाणे भरताना, दाणे पक्व होताना पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनांवर मोठा परिणाम होतो. हे लक्षात घेता मका लागवड गादीवाफ्यावर करावी, ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. त्यासाठी गादीवाफ्यावर मक्याच्या दोन ओळी लावाव्यात. दोन ओळींच्यामध्ये इनलाईन ठिबक सिंचनाची नळी ठेवावी.

  • ज्यांच्याकडे भरपूर पाणी साठा आहे, त्यांनी मका पिकाची पारंपरिक पद्धतीने लागवड न करता गादीवाफा तयार करून त्यावर मक्याच्या दोन ओळी लावाव्यात. दोन ओळींच्यामध्ये इनलाईन ठिबक सिंचनाची नळी ठेवावी.
  • मका लागवडीसाठी गादी वाफ्याची रुंदी ही ७५ सें.मी. आणि उंची एक फूट ठेवावी. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर करावा.
  • मका पिकास संतुलित पोषणाची जास्त गरज असते. त्यामुळे त्यांना संतुलित पोषण द्यावे. लागवडीपूर्वी गादी वाफे तयार करताना एकरी १०:२६:२६ च्या दोन गोण्या, १० किलो झिंक सल्फेट, २५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, ३ किलो बोरॅक्स जमिनीत मिसळावे. खते विभागून द्यावीत.
  • गादीवाफ्यावर मक्याच्या दोन ओळी लावाव्यात आणि दोन ओळींमध्ये इनलाइन ठिबक सिंचनाची नळी ठेवावी. गादी वाफ्यावर टोकण पद्धतीने दोन ओळीत ३० ते ४० सें.मी. आणि दोन रोपांमध्ये २० ते २५ सें.मी. अंतर ठेवावे.
  • गादी वाफ्यावर ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केल्यास पिकास कोणत्याही अवस्थेत पाण्याचा ताण पडत नाही. कणसामध्ये दाणे चांगले भरतात. उत्पादनात वाढ होते.
  • गादी वाफ्यावर लागवड केल्याने पाऊस अधिक झाल्यास पाण्याचा निचरा लगेच होण्यास मदत होईल.
  • ठिबक सिंचनामधून शिफारशीनुसार पाण्यात विरघळणाऱ्या रासायनिक खतांचा वापर करावा.

महत्वाच्या बातम्या –