अरविंद सोनवणे यांनी कोबीची लागवड केली. बऱ्यापैकी पाणी मिळाल्याने कोबीची 1 लाख 65 हजार रुपयाची रोपं विकत घेतली. खतं, औषधं, फवारणी, मजुरी असा सर्व मिळून जवळपास दोन लाख 85 हजार रुपये खर्च आला. माल काढणीला आला आणि पहिल्याच तोड्यात 100 किलो माल त्यांनी बाजारत विक्रीला पाठविला. पण त्याला अवघा 2 ते 3 रुपये किलो असा भाव मिळाला. ज्या गाडीतून माल भरुन पाठविला त्या गाडीच्या भाड्याचे पैसेही वसूल झाले नाहीत. उलट त्यात खिशातून पैसे भरावे लागले. शेवटी काळजावर दगड ठेवून आणि सरकारच्या नावाने मिऱ्या वाटत शेतकरी अरविंद सोनवणे यांनी साडेसात एकरात उभ्या कोबीच्या पिकात नांगर फिरवला.
कोबीला भावच नाही ;शेतकऱ्याने फिरवला सात एकर शेतीवर नांगर
1 Min Read
March 7, 2018
You may also like
Recent Posts
- कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट; राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती
- कोरोनाचा वाढता धोका पाहत केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- येत्या दोन दिवसांत राज्यात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार
- तापावर ‘हे’ आहेत हक्काचे घरगुती उपाय ! जाणून घ्या
- नागरिकांनी ‘लॉकडाऊन’ला गांभिर्याने घेतलेले नाही, तर कठोर ‘लॉकडाऊन’ लागू करणार – अशोक चव्हाण