चांगली बातमी – गोडतेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त

मुंबई : दिवाळ्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना आणखी एक सुखद बातमी मिळाली आहे, आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ गोडतेलही ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. आतापर्यंत इंधनदरात दिवसेंदिवस वाढ सुरुच होती. दिवाळीपूर्वी दिड महिन्यांत पेट्रोल डिझेलच्या दरात पंधरा वेळा वाढ करण्यात आली होती. जगातील खाद्यतेल बाजारात पुरवठा वाढला आहे. खाद्येतलाची टंचाई येणाऱ्या काळात जाणवली जाणार नाही. गोडतेलाच्या किमती अजून कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ऑल इंडिया एडिबल ऑइल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने आयात शुल्कामध्ये कपात केली आहे. त्यामुळे प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी त्यांच्या घाऊक दरामध्ये किमान ४ ते ७ रुपयांची कपात केली आहे. ही आयात शुल्क कमी झाल्यानंतर लगेच ही कपात व्हायला हवी होती. मात्र, उशिरा का होईना दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.