Share

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटचा मोठा फटका; १५ हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान

Published On: 

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटचा मोठा फटका; १५ हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain)  पडला. ८,९ जानेवारीला अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात ८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडला. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कापूस, हळद, कांदा, गहू, भाजीपाला, हरभरा, संत्रा, केळी, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्यामुळे तब्बल १४ हजार ८३० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात चार तालुक्‍यांत ९६ गावांमध्ये १४ हजार ८३० हेक्‍टरवरील पीक नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या
राज्यातील ‘या’ जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटचा मोठा फटका; १५ हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान

🕘 संबंधित बातम्या