Share

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज पावसाने लावली जोरदार हजेरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात (district) पावसाने जोरदार हजेरी लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १ तास पाऊस झाला, या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात थंडी वाढली आहे.

हवामान (Weather)  विभागाच्या अंदाजानुसार आज विदर्भात जोरदार  पावसाचा   इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर राज्यात अनेक भागात मागील काही दिवसापासून जोरदार पावसासह गारपीटीने हजेरी लावली आहे. थंडी च्या दिवसात पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.

राज्याच्या काही भागांत सकाळी धुक्यासह दुपारी ढगाळ हवामान पहावयास मिळत आहे. राज्यात शनिवारी , रविवारी , सोमवारी आणि बुधवारी  अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे विदर्भात बर्‍याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसह नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या