इतरांपेक्षा थंडीचा जास्त त्रास होत असेल : तर हे असू शकतात आजार…

हिवाळा आला कि थंडी वाजते प्रत्येक जण हा स्वेटर घालून फिरताना तसेच शेकुटी करून उब घेताना आपल्याला दिसतात. पण आपल्या भोवती असे लोक हि असतात ज्यांना सामान्य लोकांपेक्षा अधिक थंडी वाजते. जास्त थडानी वाजत असल्यास त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. असे लोक थंडीच्या दिवसांमध्ये घराच्या बाहेर सहसा जात नाही. अश्या व्यक्तींना पाहील्यास तुमच्या मनात नक्की प्रश्न पडत असेल कि ह्यांना एवढी थंडी का जाणवत असेल ? अनेक जण या समस्येकडे दुर्लक्ष हि करताना आपल्यला दिसतात मात्र असे दुर्लक्ष करणे धोकादायक व जीवघेणे असू शकते.अशा व्यक्तींना पुढे चालून अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. शरीरामध्ये जर व्हिटॅमिनचे प्रमाण कमी असेल तर अशा समस्येंचा जाणवतात.

हे असू शकतात आजार…(These can be diseases …)

१ ) मधुमेह(Diabetes) – आज काल अनेकांना मधुमेहाचा त्रास जाणवतो. या आजारात शरीरातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित झाल्याने विविध समस्या निर्माण होतात. तसेच मधुमेहाचा रक्तप्रवाहावर देखील विपरित परिणाम होताना दिसतो. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्हाला एका सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक थंडी वाजू शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तींना थंडीच्या दिवसांमध्ये सारखा सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो.

२ ) नसांमध्ये कमजोरी(Weakness in the veins) – अनेकवेळा नसा कमजोर पडतात. अशावेळी माणूस अशक्त बनतो. शरीरात अशक्तपणा आल्याने थंडी अधिक जाणवते.

३ ) व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असणे(Vitamin B12 deficiency) – शरीरामध्ये जर व्हिटॅमिन बी 12 ची कमी असेल तर तुम्हाला थंडीचा त्रास जाणून शकतो.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन बी 12 असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करावे.

४ ) ऍनेमिया(Anemia) – ऍनेमिया मध्ये तुमच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या कमी झालेली असल्यास. तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. अशक्तपणा येतो आणि थंडी जाणवते व तुम्हाला एका सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक थंडी जाणवू शकते.

आतून गरम राहण्यासाठी या पदार्थांचे सेवन करावे…(Consume these foods to stay warm inside …)

आहारामध्ये नियमितपणे फळे, दूध, तूप, मध, तिळ, गूळ अशा पदार्थ्यांचा समावेश करा.

महत्वाच्या बातम्या –