खानदेशात बाजरीचे क्षेत्र दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार

खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार आहे. बाजरी पेरणीची लगबग मागील आठवडाभरापासून खानदेशात सुरू आहे. यातच बियाण्यांबाबत कृषी विभागाने व्यवस्थित नियोजन न केल्याने अपेक्षित वाण बाजारात उपलब्ध होत नाही आहे. कंपन्यांकडून बियाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

गुडघ्यांच्या दुखण्यावर ‘एरंडेल तेल’ गुणकारी

खानदेशात रब्बीमध्ये दरवर्षी पाच ते सहा हजार हेक्‍टरवर बाजरीची पेरणी केली जाते. यंदा ही पेरणी सुमारे आठ ते साडेआठ हजार हेक्‍टरपर्यंत जाऊ शकते. कारण अनेक शेतकरी कापसाखालील व इतर पिकांखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात बाजरीची पेरणी करीत आहेत. काही शेतकरी कांदेबाग केळीची काढणी ९० टक्के झालेल्या क्षेत्रात बाजरी पेरणी करीत आहेत.

पावसामुळे द्राक्ष बागांचे ९ हजार कोटींवर नुकसान

यंदा खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने चारा हवा तेवढा नाही. यामुळे चाऱ्याची साठवणूक पुढे महाग होऊ शकते. यासाठीदेखील अनेक शेतकरी बाजरी पेरणी करीत आहेत. सध्या धुळे, साक्री, शिंदखेडा या भागातील पेरणी ६० टक्‍क्‍यांवर झाली आहे. तर चोपडा, जळगाव, शहादा या भागातील पेरणी सुरू आहे. जळगाव, चोपडा, शहादा येथील बाजारात वाणांचा तुटवडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.