Ayurvedic Diet | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Ayurvedic Diet | टीम कृषीनामा: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही पण जर उपाय शोधत असाल तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकतात. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होऊ शकते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात पुढील गोष्टींचा समावेश करा.

भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds-Ayurvedic Diet)

भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या बियांचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. कारण भोपळ्याच्या बियामध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन सी इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे भोपळ्याचे बियांचे सेवन करणे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

हळद (Turmeric-Ayurvedic Diet)

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन मेंदूला तीक्ष्ण बनवतात. त्याचबरोबर हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. हळदीच्या सेवनाने शरीर मोसमी आजारांपासून दूर राहते.

सुकामेवा (Dry fruit-Ayurvedic Diet)

स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही सुक्यामेव्याचे सेवन करू शकतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि आयरन आढळून येते, जे स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करते. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही बदाम आणि अक्रोडाचे सेवन करू शकतात.

ब्रोकोली (Broccoli-Ayurvedic Diet)

ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्रोकोलीमध्ये फायबर, पोटॅशियम, आयरन, सोडियम यासारखे घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर ब्रोकोलीमध्ये विटामिन के आढळून येते, जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे ब्रोकोलीचे सेवन करणे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Skin Care With Tomato | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी टोमॅटोसोबत ‘या’ गोष्टींचा करा वापर

Pista Milk Benefits | दुधामध्ये पिस्ता उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Hair Fall | केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो

Gram Suraksha Yojana | ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर